तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय; उदयनराजे यांचा रामराजेंना इशारा

सातारा : तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय. माझ्या सारखा कोणी वाईट नाही. माझ्या कॉलर वर बोलायचे असेल तर समोर येऊन बोलावे. असा इशाराच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता दिलाय.ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्यांनी यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य पदी निवडीवरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. उदयनराजे म्हणाले, मी केलेली नौटकी दिसते. लावणी म्हणतो, या पुढेही करतच राहणार. मी नेहमीच खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझ्या वागण्यात बदल होणार नाही. मी तत्व सोडून बोलत नाही. माझ्या स्वभावात बदल करू शकत नाही. ‘मैं ने एक बार कमिटमेंट कर दी, तो मै खुद की, बी नही सुनता’ असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवडीवरूनही उघडपणे नाराजी व्यक्त केली. राजघराण्यातील मला नको पण शिवेंद्रसिंहराजे यांना तरी संस्थेवर घ्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. ज्यांचे योगदान नाही अशा लोकांची निवड करून राजघराण्याला डावलले गेल्याचेही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...