अजिंक्यता-यावर साजरा होणार ‘सातारा स्वाभिमान दिवस’

सातारा : छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची जिवंत आणि ज्वलंत राजधानी म्हणून साता-याचा देशभर लौकिक आहे. युगनिर्मात्या शिवरायांचे नातू व धर्मवीर संभाजीराजेंचे पुत्र छत्रपती शाहू महाराज मोघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर त्यांचा अजिंक्य ता-यावर राज्याभिषेक झाला. या विलक्षण घटनेला 310 वर्ष पूर्ण होत असून सातारा शहराच्या संस्थापकांचा स्मरणदिन व ‘सातारा स्वाभिमान दिवस’  12 जानेवारी रोजी अजिंक्य ता-यावरील राजसदर येथे साजरा केला जात असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समितीच्या वतीने सुदामदादा गायकवाड यांनी दिली.

bagdure

दरम्यान, 12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्य ता-याच्या राजसदरेवर सकाळी 7 वाजता ज्येष्ठ इतिहास तज्ञ व शिवव्याख्याते पांडुरंग बलकवडे व डॉ. संदिप महिंद गुरूजी यांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रत्येक देशवासियाला भारतीय स्वातंत्रदिनाचे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला महाराष्ट्र दिनाचे महत्व आहे. तसाच 12 जानेवारी हा दिवस प्रत्येक सातारकराला वंदनीय आहे. छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक, मंचकारोहण झाल्याचा हाच तो दिवस. काहीसा विस्मृतीस गेलेला आहे. वास्तविक 23 मे 1698 ला सातारा किल्ल्यावर गादीची स्थापना केली. तरी छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक झाला तो 12 जानेवारी 1708 रोजी. विधिवत राज्याभिषेक झाल्यानंतरच साता-याला ख-या अर्थाने राजधानीचा मान मिळाला. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची ही तिसरी राजधानी अखंड हिंदुस्थानात डौलाने फडकू लागली. गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य ता-यावर हजारो हात जीर्णोद्धारासाठी झटत आहेत. अशा जीर्णोद्धारासाठी झटणाऱया सातारकरांचे समस्त शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे सचिव महेश पाटील व उपाध्यक्ष शेखर तोडकर, शरद पवार, प्रवीण धुमाळ, अमोल खोपडे, कृष्णा भुजबळ, अविनाश कापले, रितेश मोरे, आकाश गायकवाड यांनी केले आहे. अजिंक्यता-यावर आयोजित विविध उपक्रमांना विविध संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर साता-यात मोठी घराणी कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.

You might also like
Comments
Loading...