शिवसैनिक हत्याकांड : अहमदनगर नंतर साताऱ्यात देखील शिवसैनिक रस्त्यावर

blank

सातारा : अहमदनगर येथील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या हत्येच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये केडगाव, अहमदनगर येथील पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.