पाच लाखाची रोकड लांबविल्याप्रकरणी एकास अटक

crime

सातारा : प्रतापगंज पेठ येथील शिवशक्ती अपार्टमेंटमधील घरातील कपाटातील लॉकर बनावट चावीने उघडून सुमारे 5 लाखाची रोकड लांबविल्या प्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने महादरे,( ता. सातारा) येथील एकास अटक केली आहे.त्याच्याकडे लपवून ठेवलेली 4 लाख 60 हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, प्रतापगंज पेठ येथील शिवशक्ती अपार्टमेंटमधील गणेश जगन्नाथ साळुंखे (वय 34) यांनी आपल्या घरातील कपाटातील लॉकर बनावट चावीने उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे 5 लाखाची रोकड दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी लंपास केली होती. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली होती.

Loading...

शाहुपूरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक ससाणे, पो. हे. कॉ. हिम्मत दबडे-पाटील, हसन तडवी, बालत मुल्ला, पो. ना. प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, अधिक खरमाटे, पो. कॉ. अमित माने, स्वप्निल कुंभार, आशिकेष डोळस, मोहन पवार, पंकज मोहिते हे पेट्रोलिंग करताना मिळालेल्या माहितीवरुन गणेश साळुंखे यांचे मेव्हणे नितीन मुरलीधर कदम रा. महादरे, ता. सातारा यांच्याकडे खूप पैसे असून ते ऐशआरामात राहून दारुमध्ये पैसे खर्च करत असलेची माहिती समजली. सातारा बसस्थानकाच्या बाहेरील रिक्षा स्टॉपवर त्याला ताब्यात घेण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पो. नि. चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखली पथकातील कर्मचारी, अधिकारी यांनी खडसून चौकशी केली असता संशयीत नितीन कदम याने चोरीची कबूली दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात