‘त्यांना’ आता देवसुद्धा क्षमा करणार नाही – उदयनराजे भोसले

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचेचं नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. स्वतःला भगिरथ म्हणवून घेणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना काहीच काम केले नाही. अशी टीका उदयनराजे यांनी केली.

नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. स्वतःला भगिरथ म्हणवून घेणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना काहीच काम केले नाही. मंत्रीपदी असताना लाल दिव्याच्या गाडीचा वापर फक्त लोकांना हिणवण्यासाठी केला, त्यांना आता देवसुद्धा क्षमा करणार नाही, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, स्वतःच्या स्वार्थासाठी १४ वर्ष पाणी बारामतीला पळवलं अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी केली.