साताऱ्याचा उमेदवार ठरला; उदयनराजेंंच्या नावावर शिक्कामोर्तब

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीत शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक नेत्यांमधील सर्व वाद संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता साताऱ्यातून निवडणूक लढवण्याचा उदयनराजे भोसले यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारा मतदारसंघात आ शिवेंद्रराजे आणि खा उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्यात पवार यांना यश आल्याचं कळतय. तसेच खुद्द पवार यांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही राजेंमध्ये दिलजमाई झाली असून एकदिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...

सातारा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा आग्रह उदयनराजे समर्थकांच्या बैठकीत केला गेला असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे दोन्ही राजेंमधील वादात पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला