fbpx

विनयभंगाचे गुन्हे असणाऱ्या गोरेंना भाजपात प्रवेश देऊ नये, अन्यथा… – भाजप पदाधिकारी

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजप प्रवेश देऊ नये असे मत भाजपाचे मण-खटाव विधानसभा आध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांनी व्यक्त केले आहे. आमदार जयकुमार गोरे यांचा जनाधार राहिला नसल्यामूळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत. म्हणून ते भाजपाच्या प्रवेशासाठी धडपडत आहेत, अशी टीका कापसे यांनी केली आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राध्कृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या असताना, कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते यामध्ये आमदार जयकुमार गोरेंचाही समावेश होता, परंतु काल राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश झाला त्यांची मंत्रिमंडळात वर्णीही लागली. दरम्यान, आमदार गोरेंचाही भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. परंतु आमदार गोरेंच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकार्यांनी विरोध केला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात दहिवडी येथील पक्ष कार्यालयात भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पार पडली. याबैठकीत आमदार जयकुमार गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव करण्यात आला. इतकेच नव्हे तर, जयकुमार गोरे यांचा काँग्रेसमध्ये सध्या दंडेलशाही कारभार सुरू आहे. त्याठिकाणी त्यांनी उन्माद  घातला असल्याने त्यांच्या निकटचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षात, लोकांमध्ये त्यांचा जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना भाजपात घेतल्यास पक्षाशी प्रामाणिक असणार्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमदार गोरे यांना पक्षात घेऊ नये. असे मत पदाधिकार्यांनी बैठकीत व्यक्त केले.

याचबरोबर, ज्या उमेदवारावर विनयभंग, बलात्कार, फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्या उमदेवारास पक्षाने तिकिट देऊ नये. सामान्य माणसाला तिकीट दिले तरी आम्ही स्वखर्चाने त्या उमेदवारास निवडून आणणार. ज्याला पक्ष तिकीट देईल त्यांचे मनापासून काम करून निवडून आणू. मात्र चूकीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही साथ देणार नाही. असा ठरावही या बैठकीत करण्यात आला.