कोरोनामुळे सातारा-अमरावतीकरांच्या समस्या वाढल्या

corona

सातारा : राज्यात, आणखी २३कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून आता राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ८९२ झाली आहे. नवीन २३ रूग्णांमध्ये १० रूग्ण मुंबईत आढळले असून पुणे शहरात ४, अहमदनर -३, बुलडाणा आणि नागपूर इथं प्रत्येकी २, तर सांगली आणि ठाण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत ५२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यृ झाला आहे.

देशभरात कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ४२१ वर पोचली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११४ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. उपचारानंतर ३२५ रुग्ण यातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे.

सातारा जिल्ह्यात कराड इथं काल एका ६० वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉजिटिव आल्यानं जिल्ह्यातील्या कोरोना बाधितांची संख्या आता ६ झाली आहे. काल सातारा इथं मृत्यू झालेल्या ६३ वर्षीय पुरुषाचा अहवाल प्राप्त झाला असून तो कोरोनाबाधित असल्याच आढळून आलं आहे. त्याचा मृत्यू कोरोना तसंच हृदय विकाराच्याधक्क्यानं झाल्याच जिल्हा प्रशासनानं जाहीर केले आहे.

अमरावती इथं एका ५९ वर्षीय कोरोना संशयीत नागरिकाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इसमाचे लाळेचे नमुने तपासणीसाठी दिले असून, त्याचा अहवाल प्रलंबित आहेत. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं विलगीकरण केलं असून आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत.