fbpx

सोडचिट्टी अन् पोटगीवरून सासू, सुनेला मारहाण

sexual harassment by teacher in paithan

प्रतिनिधी /उदगीर: शहरातील औरंगपूरा परिसरात अलहिलाल शाळेसमोर सासू असलेल्या शिक्षिकेस मारहाण झाल्याची घटना घडली. मुलाला त्याच्या पत्नीस सोडचिट्टी द्यायला लावली या कारणावरून शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणात घटस्फोटीत सुनेनेही पोटगीच्या कारणावरून मारहाण झाल्याची तक्रार शहर पोलिसात दिल्याने परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्षिका बशीरबेगम असिफ नबीज या नेहमी प्रमाणे शाळेत गेल्या होत्या यावेळी आरोपी तहरींन आसिफ सय्यद, वासीफ असिफ सय्यद, इब्राहिम पिंचणी, रफी पिंचणी, यांनी संगनमत करून त्यांना औरंगपुरा येथील अलहीलाल शाळेसमोर गाठले. या आरोपींनी शिक्षिकेला ‘ तू तूझ्या मुलास त्याच्या पत्नीला सोडचिट्टी का द्यायला लावलीस’ असे म्हणत लाथा बुक्याने मारहाण करून जखमी केले. आणि शिक्षिकेची पर्स मधील ३५ हजाराचा ऐवज काढून घेतल्याची तक्रार बसिराबेगम असिफ नबीजी यांनी पोलिसात दिली.

तसेच याच प्रकरणात घटस्फोटित सुनेनही पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली. घटस्फोटित सून तहरींन कासीबी नबीजी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी संगनमत करून पोटगी ची रक्कम का वाढवलीस. असे म्हणत आरोपी बसिराबेगम असिफ नबीजी, सिराज असिफ नबीजी व अन्य दोघे यांनी मिळून हातातील नेलकटरने कपाळावर वार करून जखमी केले. आणि मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिली या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर आणि नारायण डप्पवाड करत आहेत.

1 Comment

Click here to post a comment