माझी नेमणूक नियमानुसारच; डॉ चंदनवालेंनी फेटाळले तृप्ती देसाईंंचे आरोप

dr ajay chandanwale

पुणे: माझी नेमणूक हि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या नियमानुसारच करण्यात आली आहे. शासनाचे नियम आणि आपल्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता पद मिळाले असल्याच सांगत डॉ अजय चंदनवाले यांनी तृप्ती देसाईकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी डॉ अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देत ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र बनवत शासन आणि अपंगांची फसवणूक केली असल्याने, मुख्यमंत्र्यानी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील केली आहे.

दरम्यान, या पूर्वीही आपल्यावर असे आरोप करण्यात आले होते. मात्र, सत्य हे सत्य असते एका दाव्यामध्ये कोर्टाने देखील माझ्याबाजूने निकाल दिला असल्याची माहिती डॉ चंदनवाले यांनी दिली आहे.