‘रेप के बदले फिल्म इंडस्ट्री में रोटी मिलती है’, सरोज खान यांनी तोडले अकलेचे तारे

मुंबई – सिनेइंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचविरोधात अनेक मंडळी आपला आवाज बुलंद करत आहेत मात्र दुसरीकडे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी कास्टिंग काऊचसंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘रेप के बदले फिल्म इंडस्ट्री में रोटी मिलती है’ असं धक्कादायक विधान करत एकप्रकारे खान यांनी कास्टिंग काऊचचं समर्थनच केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सरोज खान ?
”कास्टिंग काऊच म्हणजे काही नवीन बाब नाही. ही गोष्ट तर बाबा आदमच्या काळापासून चालत आली आहे. प्रत्येक मुलीवर कोणी-ना-कोणी हात साफ करण्याचा प्रयत्न करतंच. सरकारी लोकं करतात तर मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्याच हात धुवून मागे का लागले आहात?. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही मुलीसोबत काही चुकीचे झाले तरी तिला नोकरी मिळते. बलात्कार करुन सोडून दिलं जात नाही. आता मुलीला काय हवंय, हे सर्व काही तिच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला अशा लोकांच्या हाती यायचे नसेल तर येथे येऊ नका. जर तुमच्याकडे कला आहे तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये स्वतःला विकण्याची आवश्यकता नाही”.

You might also like
Comments
Loading...