भावकीचा वाद चव्हाट्यावर, भारतानेचं सामन्यात बाजी मारावी अशी सर्फराजच्या काकांची इच्छा

टीम महाराष्ट्र देशा : काही वेळातच भारत वि. पाकिस्तान सामन्याला मँचेस्टरच्या मैदानावर सुरवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच देशभरात अनेक ठिकाणी भारताच्या विजयासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली जात आहे. भारतीय संघाच्या विजयासाठी जगभरातून नेहमीच प्रार्थना केली जाते. मात्र आता खुद्द पाकिस्तानच्या कर्णधाराच्या काकांनी देखील आजच्या लढतीत भारताने बाजी मारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याचे काका मेहबूब हसन यांनी भारताने बाजी मारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, वर्ल्ड कप ही महत्त्वाची स्पर्धा आहे. आशा करतो याही वेळेस भारताकडून पाकिस्तानचा पराभव व्हावा. प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे, परंतु भारत विजयी व्हावा ही अपेक्षा,”असं मत हसन यांनी व्यक्त केले. सर्फराजच्या कामगिरीविषयी ते म्हणाले,” या सामन्यात सर्फराजकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. तो माझा पुतण्या आहे. त्याने भारताविरुद्ध चांगली कामगिरी करावी. चांगली कामगिरी केल्यास त्याचे कर्णधारपद कायम राहील. पण, हा वर्ल्ड कप भारतानेच जिंकावा.

Loading...

तसेच ते पुढे म्हणाले की, भारतीय संघाप्रमाणे पाकिस्तानचा संघ समतोल नाही, असेही ते म्हणाले.”भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू वर्ल्ड क्लास आहे. पाकिस्तान संघात तसे खेळाडू नाहीत. गोलंदाज प्रत्येक सामना जिंकून देऊ शकत नाहीत. फलंदाजांनीही योगदान द्यायला हवं,”

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संघाला शुभेच्छा देत जो निकाल येईल तो स्वीकार करण्याचा सल्ला दिला आहे. तर शेवटच्या चेंडू पर्यंत लढण्याची जिद्द ठेवण्याचा मंत्र देखील पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे चाहते देखील आता आपली आज हार होणार आहे अश्या समजात आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली