मुख्यमंत्र्यांवर आरोप करत साडी, चोळी भेट

cm fadnvis

ठाणे : भीमा कोरेगाव परिसरातील दंगल थोपविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरले आहेत. ती दंगल नियोजित होती. भीमा कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज जमा होणार, हे माहीत असतानाही तेथील गावकर्‍यांनी दोन दिवस आधीच ठराव करून जाणीवपूर्वक दुकाने बंद ठेवली आणि आंबेडकरी समाजवर नियोजित हल्ला झाला. हे रोखण्यास मुख्यमंत्र्यांना अपयश आले आहे. असा आरोप करीत ठाण्यात स्वाभिमानी युवक संघटनेने मुख्यमंत्री फडणवीस यांना साडी आणि चोळी भेट म्हणून पाठवली आहे. पत्रकार परिषदेत स्वाभिमानी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. गायकवाड यांनी, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाही पोलीस त्यांना अटक का करीत नाही? असा सवाल उपस्थित करीत भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दगडफेकीमुळे आंबेडकरी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. अशी घटना होणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला नाही. वढू गावच्या परिसरात एका इमारतीवर दंगलखोरांचा जमावाला एकत्र येण्यास संधी दिली. दगड, लाठ्या काठ्या आणि इतर शस्त्र जवळ बाळगू दिले; याची मुख्यमंत्र्यांना कल्पना नसेल तर मग ते या पदाला लायक नाहीत. त्याकरिता त्यांना साडी आणि चोळी भेट देण्यात येत आहे, असे दयानंद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. कुरियरने ही साडी आणि चोळी ते मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहेत. भेट स्वीकारायची नसेल त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. दरम्यान, वढू गावातील दुकाने बंद करणार्‍या सर्व दुकानदारांचे परवाने त्वरित रद्द करावेत अशी मागणीही त्यांनी केली. जर गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार आंबेडकरी अनुयायांवर गावकर्‍यांनी दगड फेक केली नाही तर मग दगड फेक आणि जाळपोळ करणारे गुंड भिडे यांच्या सांगली आणि एकबोटे यांच्या पुण्यातून आले होते का? त्याचाही पोलिसांनी शोध घ्यावा. असेही गायकवाड म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू