संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान, सारथीच्या बैठकीत गोंधळ

sambhajiraje

मुंबई : मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला. मात्र संभाजीराजे यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे बैठकीत झालेला गोंधळ मिटला.

आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्य सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी गोंधळ घातला.

‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते’

दरम्यान यानंतर अजित पवारांनी सभागृहातील बैठक आटोपती घेऊन स्वतःच्या दालनात या बैठकीचे आयोजन केलं आहे. मात्र संभाजीराजे यांनी मानपान नाट्य सोडून सारथी महत्वाची असल्याची भूमिका घेताना या गोंधळावर भाष्य करणे टाळले आहे. तर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पाटील यांनी १५ ऑगस्टला होणाऱ्या सुनवाईत जर निकाल विरोधात गेला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा दिला आहे.

‘नगरसेवक म्हणजे कूरिअरवाल्याकडचे ‘पार्सल’ आहे का एकाकडून दुसऱ्याकडे सोपवायला’