‘ऑल स्माईल इन..’कॅप्शन असलेला सारा तेंडूलकरच्या फोटोने वेधले लक्ष

sara

मुंबई : सुप्रसिध्द क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटविश्वात आपले नावलौकीक केले आहे. तसेच त्यांची कन्या सारा तेंडुलकर जरी यासर्वांपासून दूर असली तरी देखील ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. साराच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष असतं. नुकतंच साराने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या तिच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असून सौंदर्याच्या बाबतीत सेलिब्रिटींपेक्षा ही कमी नाही. ती जरी प्रसिध्दीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सचिन तेंडुलकरांची मुलगी म्हणून साराच्या पोस्टवर चाहत्यांचे चांगलेच लक्ष असतं. तिच्या एका फोटोवर बरीच चर्चा सुरु आहे. साराने सोशल मीडियावरून लंडनमधील एक फोटो अपलोड केला आहे. यात ती काळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

सारा ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. विशेष म्हणजे या फोटोत खुप सुंदर दिसत असून या पोस्टवर तिने ‘ऑल स्माईल इन धिस सिटी असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर चक्क अभिनेता कार्तिक आर्यन आणि अरमान मलिक यांनीही लाइक केले आहे. त्याचप्रमाणे बापलेकीच्या चाहत्यांकडून देखील भरपूर लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत.

महत्वाच्या बातम्