सपना म्हणते राजकारणात आले तर फक्त भाजपचीचं होईल

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच गाजलेली हरियाणामधील गायिका आणि नर्तिका सपना चौधरी हिने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. मी राजकारणात आले तर भाजप मध्येच प्रवेश करील अशी भूमिका सपना चौधरी हिने मांडली आहे.

लोकसभेच्या निवडणुका लागताच सपना चौधरी हिचे नाव चर्चेत आले होते. सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच सूत्रांकडून सांगण्यात येत होत. तर निवडणूका जवळ येताच सपना चौधरी ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अद्याप सपना चौधरी हिने कोणत्याच राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. पण राजकीय पक्षात प्रवेश करायची वेळ अलीच तर भाजपमध्येच प्रवेश करेल असे ती म्हणाली आहे.

दरम्यान, सपना चौधरीने भाजप उमेदवार मनोज तिवारी यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.