मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाचं नाही : सपना चौधरी

टीम महाराष्ट्र देशा : सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना, सपनाने आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट करत सर्वांनाच आश्चर्य करायला भाग पाडले आहे . तिच्या या गौप्यस्फोटामुळे तिचा काँग्रेसमधील प्रवेश याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचे तिने स्पष्ट केले.

शनिवारी सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आले होते. त्यातच तिचा प्रियंका गांधी यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. तो फोटो देखील जुना असल्याचे तिने सांगितले. सपना चौधरी मथुरामधून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरोधात मैदानात उतरणार असल्याचेही वृत्त होते. परंतु सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगत पुन्हा चर्चांना उधाणआणले आहे.

कोण आहे सपना चौधरी ?

Loading...

सपना हरियाणा ची प्रसिद्ध डान्सर, सिंगर आणि अभिनेत्री आहे. ती बिग बॉस च्या ११ व्या सीजनमध्ये स्पर्धक होती. तिने बॉलीवुड मधील काही सिनेमांमध्ये आयटम सॉंग देखील केले आहेत.