fbpx

लग्नपत्रिकेपासून मिळणार रोपटे

मराठवाड्यात गेल्या दोनतीन वर्षांमध्ये पडलेला दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष याचे मुख्य कारण म्हणजे वृक्षतोड असल्याचे समोर आले, यानंतर शासन पातळीवर, विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण अभियान राबवले, याचाच एक भाग म्हणून लग्न पत्रिकेच बीया असलेली तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी लग्न पत्रिका औरंगाबादेत प्रथमच करण्यात आली.

आजकाल महागड्या लग्नपत्रिका बाजारात उपलब्ध आहेत, लग्न पत्रिका कितीही छान असली अथवा महाग असली तरी कार्य झाल्यानंतर ती निरूपयोगी ठरते पण शहरातील अभियांत्रिकीचे प्राध्यापक नागेश डोंगरे यांचे १८ जून रोजी लग्न झाले, त्यांनी यासाठी ही बीयाणांची पत्रिका वाटून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्न पत्रिकेच्या कागदातच तुळस,निलगिरी, टमाटे, सिमलामिर्ची, झेंडू या झाडांच्या बीया आहेत, व त्यावर लग्नाचे मॅटर छापण्यात आलेले आहे, तसेच पत्रिकेच्या खाली या पत्रिकेचे कुंडिमध्ये अथवा जमिनीत रोपण करा व वृक्षसंवर्धनास मदत कराअसा संदेशही देण्यात आलेला आहे.

प्रा. नागेश डोंगरे हे शेतकरी कुटुंबातील असल्याने तसेच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता आपल्या लग्नाद्वारे देखील समाजिक संदेश कसा द्यावा या विचारातून हि पत्रिका तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या पर्यावरणवादी अभियंत्यास देखील जोडीदार मिळाली ती देखील पर्यावरणवादीच, अभियंता असलेल्या अनघा बावस्कर यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या पत्रिका छापून त्यावर जल ही जीवन है‘, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘, ‘रक्तदान ही श्रेष्ठ दानरक्त दाता है महाननयी शताब्दी की है पुकारमत करो वृक्षों का संहारअशा प्रकारचे सामजिक संदेश देण्यात आले आहेत.

सामाजिक संस्थाना देणार पैसे

डोंगरे परिवारातर्फे नाम फाऊंडेशनसह अनाथ मुलांसाठी शैक्षणिक मदत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सहकार्य देखील लग्नाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. तसेच लग्नावेळी आलेल्या भेटवस्तू व पैसे हे देखील याच कार्यासाठी वापरण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

—–

प्रतिक्रिया

वृक्षारोपण ही काळाची गरज

समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून, तसेच या लग्नपत्रिकेद्वारे देखील वृक्षारोपणाचे महत्व आणि काळाची गरज आहे हा संदेश अनेकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने लग्न पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. तसेच याच महिन्यात पावसाळ्याचे देखील आगमन होत असल्याने या पत्रिकेतील बीयांपासून झाडे नक्कीच येतील आणि आपलाही थोडा का होईना पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल याचा आनंद होत आहे.

प्रा. नागेश डोंगरे

वृक्षांची संख्या वाढणे गरजेचे

दोनतीन वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ बघता आणि त्या तुलनेत झांडांची कमतरता लक्षात घेऊन वृक्षांची किती गरज आणि महत्व आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे, तसेच मुलींचे देखील समाजात किती महत्व आहे हे देखील सांगण्यासाठी अशा प्रकारच्या लग्नपत्रिका आम्ही केल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने देखील अशाप्रकारे या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे ही इच्छा.

अनघा बावस्कर