संतोष लोंढे हे महापौर पदाच्या शर्यतीत अव्वल स्थानी

       पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फेब्रुवारी-२०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाने व आमदार श्री. महेशदादा लांडगे यांनी ऐतिहासीक विजय संपादित करून गेल्या १५ वर्षाच्या राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला.
  महानगरपालिकेत पक्षाचे ७७ नगरसेवक निवडून आले त्यामुळे या महानगरपालिकेत भाजपाचा महापौर होणार आहे.यावेळी महापौर पद हे ओ.बी.सी.वर्गासाठी राखीव असल्याने या समाजातील व्यक्तीला खऱ्या अर्थाने शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.
    भोसरी की चिंचवड ? महापौर कुठला यावर बरीच चर्चा चालू आहे. यामध्ये भोसरीचे प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाण या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागेवरून नगरसेवक श्री. संतोष(आण्णा) ज्ञानेश्वर लोंढे, प्रा.सोनाली दत्तात्रय गव्हाणे, सौ. भीमाबाई पोपट फुगे, श्री.नितीन ज्ञानेश्वर लांडगे हे निवडून आले आहेत. यामध्ये श्री. संतोष लोंढे यांनी लढतीमध्ये विजयश्री खेचून आणून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते मूळ ओ.बी.सी. म्हणून भोसरी विधानसभेतून महापौर पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.