Share

Santosh Bangar | लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन ; संतोष बांगर यांची पुन्हा कर्मचाऱ्यांना दमदाटी

Santosh Bangar | हिंगोली : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला. कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृषी पंपांच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतोष बांगर संतापले आणि त्यांनी दमदाटी केली.

संतोष बांगर यांची ओळख आक्रमक आमदार म्हणून आहे. यापूर्वी त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावल्या होत्या.

कारवाईची मागणी-

संतोष बांगर यांनी या उपहारगृहाच्या किचनची पाहणी केली असता बराच भाजीपाला हा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचपासून पुढे अन्न तयार करून ते लोकांना पोहचवले जात होते. तसेच शासनाने सांगितलेल्या पदार्थांपैकी कोणताच पदार्थ दिला जात नव्हते. रोज एकसारखेच अन्न दिले जात आहे. त्यामुळेच संबंधित कंत्राटदाराची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी बांगर यांनी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या : 

Santosh Bangar | हिंगोली : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Video

Join WhatsApp

Join Now