जुहू चौपाटीवर वाळूचा सांताक्लॉज

सांताक्लॉज

मुंबई : नाताळनिमित्त लक्ष्मी गौर या महिलेनी जुहू चौपाटीवरच्या वाळूवर सांताक्लॉजचे शिल्प काढून शुभेच्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे या सांताक्लॉजच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देखील देण्यात आला आहे. जुहू चौपटीवर नाताळनिमित्त हजारो पर्यटक फिरण्यासाठी येतात.

लक्ष्मी यांनी वाळूच्या साहाय्याने १२ फूट उंच अशी सांताक्लॉजची प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी सध्यातरी हा सांताक्लॉजला सेल्फी पॉईंट म्हणून झाला आहे.

सुदर्शन पटनाईक यांनीही ओरिसा मधील पुरी बीच वर वाळूवर सांताक्लॉजचे शिल्प  काढले.