गायींना तामिळ आणि संस्कृत बोलायला शिकवणार,स्वामी नित्यानंद यांचा अजब दावा

टीम महाराष्ट्र देशा- दक्षिण भारतातील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु स्वामी नित्यानंद यांनी एक अजब दावा केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही तयार करत आहोत, या भाषातंत्रामुळे गायीही तामिळ आणि संस्कृतमध्ये लवकरच बोलू शकतील असं त्यांनी म्हटलं आहे. स्वामी नित्यानंद यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लवकरच माझ्याकडे तमिळ आणि संस्कृत बोलणाऱ्या गाई असतील, असा दावा करताना नित्यानंद या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. माकडं आणि गाई यासारख्या जनावरांमध्ये अनेक अवयव नसल्यामुळे ते माणसांमध्ये आहेत. अध्यात्मिक प्रक्रियेने मला त्यांच्यात अवयव निर्माण करायचे आहेत. इतकेच नाही, तर याला वैज्ञानिकदृष्ट्या सिध्द करणार असल्याचे नित्यानंद यांनी दावा केला. एका सॉफ्टवेअरची चाचणी करुनच आपण हा दावा करत असल्याचेही ते म्हणाले.

भिडे गुरुजींच्या आंब्यानंतर आता मौलवीचे फळ ; वाचा काय केलाय अजब दावा

Comments
Loading...