आम्हाला काही माहीत नाही ; संकेत जायभायेच्या मित्रांचे कानावर हात

टीम महाराष्ट्र देशा : प्रेमप्रकरणातून दुचाकीस्वार संकेत संजय कुलकर्णी (१९, मूळ रा. पाथरी, परभणी) या तरुणाचा भररस्त्यावर कारखाली चिरडून खून केल्याप्रकरणी कारचालक आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये (२३, रा जयभवानी नगर, औरंगाबाद) याचे मित्र उमर शेख पटेल (वय 22, रा. बीड बायपास परिसर) व विजय जोग व संकेत मचे यांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संकेत प्रल्हाद जायभायेने जेव्हा कार रिव्हर्स घेतली त्यामूळे विजय जोग यांच्या पायाला दुखापत झाली त्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो म्हणून पुढे काय झाले आम्हला माहीत नाही अशी महिती संकेत जायभायेच्या मित्रांनी चौकशीत दिली. एका मुलीवरच्या एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वाद झाला आणि २३ मार्च रोजी आरोपी सकेत जायभाये याने संकेत कुलकर्णीला भेटायला बोलवून आपल्या कारने त्याच्या दुचाकीला उडवले. त्यात संकेत कुलकर्णी कारखाली चिरडला गेला. उपचारादरम्यान संकेतचा जीव गेला.