VIDEO- संजय दत्तच्या बायोपिकचा टिझर रिलीज

वेब टीम- राजकुमार हिरानी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तवर आधारीत बायोपिक ‘संजू’ सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे.

‘अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है’, असं म्हणत रणबीर येरवडा कारागृहातून बाहेर पडताना या टीझरची सुरुवात होते. अमली पदार्थांच्या व्यसनापासून ते कारागृहात रवानगीपर्यंत सर्व काही टिझर मध्ये आहे. फ्रेंड्स, गर्ल फ्रेंड्स आणि एके ५६ रायफल यांचाही टीझरमध्ये उल्लेख आहे.

या सिनेमात अभिनेत्री मनिषा कोईराला संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर परेश रावल संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. संजय दत्तवर आधारीत बायोपिक ‘संजू’ सिनेमा 29 जूनला रिलीज होणार आहे.

संजू- माणूस एक आयुष्य पाहा टीझर- 

बायोपिक ‘संजू’ सिनेमाचा टीझर वर काय म्हणाला संजय दत्त बघा हा व्हिडीओ-