क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेमधील न्युझीलँडने पहिला सामना आपल्या नावावर केला असून दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा व अखेरचा सामना खेळायला जात आहे. हा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आणू नये अशी आशा दोन्ही संघांना आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यामध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) ला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा अपेक्षाच राहिली. कारण आजच्या सामन्यासाठी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हन मधून वगळण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेमध्ये न्यूझीलंड संघाने पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, आयसीसी क्रमवारी टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याबरोबरच क्रमवारीत आपले नाव वरती आणण्याचे लक्ष साधत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन एक दिवसीय सामन्यातील तिसऱ्या डावाची सुरुवात भारतीय सलामीवीर कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि युवा फलंदाज शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी केली. पहिल्या 10 षटकांमध्ये भारतीय संघाने 1 गडी गमावून 43 धावा केल्या आहेत. दरम्यान, पावसाळी वातावरण असल्यामुळे चेंडू स्विंग होत आहे. न्यूझीलंड टीमच्या टीम साऊदीने चांगली गोलंदाजी केली आहे. शिखर धवनने 35 चेंडू मध्ये 25 धावा काढल्या. तर शुभमन गिल 22 चेंडू 13 धावा करत बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा इनफॉर्म फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खेळण्यासाठी आला.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये संजू सॅमसनला संधी न दिल्यामुळे शिखर धवनने त्याला पहिल्या एक दिवसीय सामन्यात संघात स्थान दिले होते. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) अपयशी ठरल्यानंतर संजू आणि श्रेयसने टीम इंडियाचा डाव सावरला होता. पण, भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नव्हता. अशा परिस्थितीत अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी संजू सॅमसनला दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामधून वगळण्यात आले असून त्याच्या जागेवर दीपक हुड्डा (Dipak Hooda) ला संधी देण्यात आली. तर, तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये कोणताच बदल झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- Zakir Khan | झाकीर खानच्या स्टँड-अप कॉमेडी शो ‘तथास्तु’चा ट्रेलर रिलीज
- Sunil Gavaskar | विराट-रोहितने सतत ब्रेक घेतल्यामुळे गावस्कर संतापले, म्हणाले…
- Raj Thackeray | “…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, राज ठाकरेंचा घणाघात
- Narayan Rane | “…तेव्हा नाही का वाटली लाज?”, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर काव्यमय टीका
- Narayan Rane | “बाळासाहेबांना सावकरांबद्दल सन्मान होता तो उद्धव ठाकरेंना आहे का?”; नारायण राणेंचा खोचक सवाल