संजू बाबा नागपूरात ; काँग्रेस मंत्र्याच्या भेटीनंतर पोहोचला नितीन गडकरींच्या निवासस्थानी

sanju baba

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त याने नागपुरमध्ये शनिवारी नितीन गडकरींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आज याची माहिती समोर आली आहे. संजय दत्त अचानक गडकरींच्या घरी का गेला, त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. संजय दत्त शनिवारी नागपुरमध्ये होता. त्याने वर्धा रोडवरील गडकरींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. संजय दत्तने गडकरींच्या पाया पडून आशिर्वादही घेतले. गडकरींव्यतिरिक्त संजय दत्तने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची देखील भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेता संजय दत्त गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये मुक्कामी आहे. काल सकाळी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असं सांगण्यात आलं आहे.

तसेच नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी संजयने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली. राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. डॉ. नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले. मात्र 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित स्वागत समारंभ कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळेस कुणालाही लग्नाला उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते. यावेळी संजय दत्त याने नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षा यांस विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. ह्या छोटेखानी भेटीत संजय दत्त यांनी राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

महत्त्वाच्या बातम्या

IMP