fbpx

अहमदनगर दक्षिण मधून लोकसभेला संजीव भोर-पाटील?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत. तसे अनेक नेते आपले आपले मनसुबे जाहीर करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लवकरच हितचिंतक, समर्थकांचा भव्य मेळावा घेऊन अहमदनगर दक्षिण मधून लोकसभेची निवडणूक लढण्याचा संकल्प जाहीर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र देशाशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर-पाटील यांनी दिली आहे.

यावेळी संजीव भोर-पाटील बोलताना म्हणाले की, सामान्यातला माणुस म्हणून अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व शेतकरी वर्गाच्या समस्यांवर थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरावे.तसेच इतर ठिकाणीही अनेकांना यासाठी उद्युक्त करावे.यासाठी असंख्य समर्थकांकडून सतत आग्रह,सूचनांचा भडीमार सुरु आहे.

सर्वांचा आदर करीत आज जिल्ह्यातील काही निवडक पदाधिकारी,सहकारी कार्यकर्त्यांची राहुरीत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. काल सिंदखेडराजा येथून जिजाऊंचे आशिर्वाद घेऊन आलेले आहात, आता अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा लढण्याचा संकल्प जाहीर करा असा आग्रह बहुतेक सर्वांचाच होता.जनतेचा उमेदवार म्हणून पाठबळ मिळेल असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला. लवकरच हितचिंतक, समर्थकांचा भव्य मेळावा घेऊन सर्वांची भूमिका समजून घेऊ व मगच काय ते ठरवू , असे यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर-पाटील म्हणाले.