Tuesday - 28th June 2022 - 3:50 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Sanjay Shirsat : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी करायला लागायची, संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

byomkar
Thursday - 23rd June 2022 - 1:34 PM
Sanjay Shirsats letter to the Chief Minister संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी

pc-facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांच्या पाठिंब्याने वेगळा गट स्थापन केला आहे. शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील नाराजी अजूनही कमी होताना दिसत नाहीये. उद्धव ठाकरे यांनी काल लाईव्ह येत बंडखोर शिवसेना आमदारांना भावनिक आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी शासकीय वर्षा बंगला देखील सोडला. यानंतर आज बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

आमदार संजय शिरसाट यांचं पत्र जसंच्या तसं…
प्रति,
दि. 22 जुन 2022
श्री. उध्दवजी ठाकरे.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय
पत्रास कारण की…
काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय, असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना, अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे. हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्या ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना. आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका, असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली काम करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासाविस व्हायचा. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं माननीय बाळासाहेबांचं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक
कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
काल तुम्ही जे काही बोललात. जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.
फळावे लोभ असावा
आपलाच संजय शिरसाट

महत्वाच्या बातम्या :

  • Eknath Shinde : “आमच्यासाठी दारं बंद होती, आमचा विठ्ठल फक्त बाळासाहेब” ; एकनाथ शिंदेंनी शेअर केल्या आमदाराच्या भावना
  • Uddhav Thackarey : “उद्धव ठाकरेंच्या चार चुका, स्वतःला बाळासाहेब समजणे…” ; असीम सरोदेंच ट्वीट
  • VIDEO : गब्बर इज बॅक..! नेट्समध्ये शिखर धवनची ‘जब्बर’ बॅटिंग; तुम्हीच पाहा!
  • Siddharth Jadhav : घस्फोटाच्या चर्चांवर सिद्धार्थ जाधवचा मोठा खुलासा! म्हणाला…
  • sandip deshpande : “….गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली” ; संदीप देशपांडेंचा ट्विटद्वारे निशाणा

ताज्या बातम्या

I sincerely tell you as the head of the family Chief Ministers heartfelt request to the rebels संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Maharashtra Political Crisis : “कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो…” ; मुख्यमंत्र्यांची बंडखोरांना कळकळीची विनंती

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206KeshavUpadhyayUddhavThackeray346x1881jpg संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Keshav Upadhyay : “सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण..” केशव उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Maharashtra Political Crisis eknathshindecanmakegovernmentinmaharashtrawithbjponthisformula संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंचा फार्म्युला ; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206uddhavthackeray31jpg संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Shivsena : सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून स्पष्टीकरण…

महत्वाच्या बातम्या

I sincerely tell you as the head of the family Chief Ministers heartfelt request to the rebels संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Maharashtra Political Crisis : “कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो…” ; मुख्यमंत्र्यांची बंडखोरांना कळकळीची विनंती

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206KeshavUpadhyayUddhavThackeray346x1881jpg संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Keshav Upadhyay : “सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण..” केशव उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Sunil Gavaskar backs Sarfaraz Khan to get Team India callup soon संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
cricket

सरफराज खानला टीम इंडियात स्थान मिळावं का? सुनील गावसकरांनी दिलं ‘असं’ उत्तर!

Samaira told in a video about her covid positive father Rohit Sharmas health संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
cricket

VIDEO : रोहित शर्मा आता कसा आहे? मुलगी समायरा म्हणते, “बाबा त्यांच्या खोलीत…”

Maharashtra Political Crisis eknathshindecanmakegovernmentinmaharashtrawithbjponthisformula संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंचा फार्म्युला ; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

Most Popular

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206collage5jpg संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Sanjay Raut : “महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे पण…” ; संजय राऊत याचं मोठ विधान

Jug Jug Jio failed on Monday with box office collections dropping by 70 per cent संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Entertainment

Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ ठरला सोमवारी अपयशी, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ७० टक्क्यांची घसरण

If you want to go with BJP you have to come up with a suitable proposal Uddhav Thackeray संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Editor Choice

Uddhav Thackeray : भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे – उद्धव ठाकरे

Finally Sai Tamhankar confessed his love Said संजय शिरसाटमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी
Entertainment

Sai Tamhankar : अखेर सई ताम्हणकरने दिली प्रेमाची कबुली! म्हणाली…

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Go to mobile version