Share

Eknath Shinde | “संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय”; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची सडकून टीका 

Eknath Shinde | मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटाने राजकीय कबर खोदली असल्याची टीका केली होती. शिवसेना नावावर निवडून येतात, आता शिवसेनेचे नाव न घेता निवडून येऊन दाखवा असंही संजय राऊत यांनी आव्हान केले होते. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी प्रत्युत्तर देत जहरी टीकाही केली आहे.

ते म्हणाले, संजय राऊतला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे, स्वतःच घरं सांभाळ ना. अकलेचे तारे कशाला तोडायला लागला. हाच माणूस राज्यसभेच्या वेळेला आमच्या पाया पडत होता. आम्ही मतदान केलेलं, म्हणून निवडून येतो, दरवेळेला मतदान करतो आणि हा आम्हाला सांगणार काय?, असे सवाल संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी केलेत.

“हा काय आमच्या मतदार संघात येतो का?,याच्या जिवावर थोडीच आमची निवडणूक चालते”, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत टीकास्त्र सोडलेत. स्वतःच आमच्या जिवावर निवडून येतो आणि तो काय सांगणार असं म्हणत शिरसाठ यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“मी खात्रीने सांगतो, माझा शब्द आहे. ज्या भागातील जे खासदार आणि आमदार निवडून गेले त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. खासदार गोडसे यांचं तर राजकीय करीयरच संपलं आहे. आम्हीच ती जागा लढवली होती. जे आमदार गेले. नांदगावपासून मालेगावपर्यंत त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं ना”, असं राऊत म्हणाले. हा आत्मविश्वास कुठून येतो. आम्ही फिरतो. लोकांमध्ये बसतो. त्यातून त्यांची चीड दिसत आहे. त्यावरून आत्मविश्वास येतो. सर्व जागेवर आहे. काही पालापाचोळा उडून गेला असेल. तो उडतच असतो. आज या गटात उद्या त्या गटात. हे काही नवीन नाहीये. शिवसेना आहे तशीच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now