Share

Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला रवाना

Sanjay Shirsat | मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना सोमवारी अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. तसेच त्यांना उच्च रक्तदाबाचा देखील त्रास झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या आदेशाने त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

संजय शिरसाट यांना हृदय विकाराचा सौम्य झटका –

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. तसेच त्यांना उच्च रक्तदाबाचा देखील त्रास जाणवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी लगेच सूत्र फिरवली आणि शिरसाट यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादला तातडीने एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सल्ल्यानेच शिरसाट यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल केले जाणार आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतय. ह्रदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना औरंगाबाद मध्ये सिग्मा रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Shirsat | मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना सोमवारी अचानक ह्रदयविकाराचा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now