Monday - 27th June 2022 - 7:32 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी आरोप केलेले ‘बडवे’ कोण ?

by omkar
Thursday - 23rd June 2022 - 2:07 PM
Sanjay Shirsat indirectly targets Sanjay Raut संजय शिरसाट यांनी आरोप केलेले बडवे कोण

pc-facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर झालं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर आज बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. संजय शिरसाट यांच्या या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पत्रात शिरसाट म्हणालेत कि, आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच so called (चाणक्य कारकून) असा उल्लेख करत शिरसाट यांनी अप्रत्यक्षरीत्या संजय राऊतांवर निशाणा साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आमदार संजय शिरसाट यांचं पत्र जसंच्या तसं…
प्रति,
दि. 22 जुन 2022
श्री. उध्दवजी ठाकरे.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय
पत्रास कारण की…
काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय, असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना, अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे. हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्या ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना. आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका, असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली काम करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासाविस व्हायचा. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं माननीय बाळासाहेबांचं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक
कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
काल तुम्ही जे काही बोललात. जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.
फळावे लोभ असावा
आपलाच संजय शिरसाट

महत्वाच्या बातम्या : 

  • Eknath Shinde : ‘आनंद सेना’ स्थापन करणार एकनाथ शिंदे?
  • Urfi Javed : उर्फी जावेदचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ! पाहा VIDEO
  • Narhari Zirwal : विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची पत्रकार परिषद
  • Sanjay Shirsat : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बडव्यांची मनधरणी करायला लागायची, संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र
  • Eknath Shinde : “आमच्यासाठी दारं बंद होती, आमचा विठ्ठल फक्त बाळासाहेब” ; एकनाथ शिंदेंनी शेअर केल्या आमदाराच्या भावना

ताज्या बातम्या

maharashtrawillremainunchangedtillnext12dayslawyerudaywarunjikar संजय शिरसाट यांनी आरोप केलेले बडवे कोण
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

BJPSena government to come in Maharashtra Deepak Kesarkara संजय शिरसाट यांनी आरोप केलेले बडवे कोण
Editor Choice

Deepak Kesarkar : महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; दीपक केसरकरांच सूचक वक्तव्य

Sanjay Raut broke Shiv Sena remove him from office Shinde supporters aggressive संजय शिरसाट यांनी आरोप केलेले बडवे कोण
Editor Choice

Maharashtra Political Crisis : “संजय राऊतांनी शिवसेना फोडली, त्यांना पदावरून हटवा” ; शिंदे समर्थक आक्रमक

If you want to go with BJP you have to come up with a suitable proposal Uddhav Thackeray संजय शिरसाट यांनी आरोप केलेले बडवे कोण
Editor Choice

Uddhav Thackeray : भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे – उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या

maharashtra-will-remain-unchanged-till-next-12-days-lawyer-uday-warunjikar
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alia's pregnancy 3 days ago, see VIDEO
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

BJP-Sena government to come in Maharashtra; Deepak Kesarkara
Editor Choice

Deepak Kesarkar : महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; दीपक केसरकरांच सूचक वक्तव्य

Famous writer Kshitij Patwardhan received the 'Ha' award
Entertainment

Kshitij Patwardhan : प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धनला मिळाला ‘हा’ पुरस्कार

IRE vs IND bhuvneshwar kumar will break the record of after taking three wickets
cricket

IRE vs IND : आणखी ३ विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमार रचणार ‘मोठा’ रेकॉर्ड; थेट ५ गोलंदाजांना टाकणार मागे!

Most Popular

Our struggle will end only after bringing people oriented government in the state - Devendra Fadnavis
Editor Choice

राज्यात लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल – देवेंद्र फडणवीस

Nitin Deshamukh: I had a false plot to have a heart attack - Nitin Deshmukh
Editor Choice

Nitin Deshamukh : मला हार्ट अटॅक आल्याचा खोटा कट रचला होता – नितीन देशमुख

MLC Election Result Shock to NCP and BJP! Two votes out of the quota of Ramraje and Uma Khapre
Editor Choice

MLC Election Result : राष्ट्रवादी आणि भाजपला झटका! रामराजे आणि उमा खापरेंच्या कोट्यातील दोन मतं बाद

atul bhatkhalkar
Maharashtra

Atul Bhatkhalkar : “बापाच्या नावावर मत मागण्याचे दिवस…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA