मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात विधान परिषद निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय हालचाली घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील इतर आमदारांनीही शिंदेंच्या वाटेवर पाऊल ठेवत त्यांच्या गटात शामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचाही समावेश आहे. सध्या ते आसाममध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असून त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.
“राष्ट्रवादी बंडखोरांना कायद्याच्या कचाट्याच अडकू पाहतेय पण हे नियमबाह्य असून त्यांनी तसं केलंच, तर त्यांना आम्ही उत्तर देऊच. यापूर्वी कधीही राष्ट्रवादीचे कोणतेही नेते शिवसेना भवनाची पायरी चढताना पाहिलेले नाही. राष्ट्रवादीच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालतोय की काय, अशी आम्हाला शंका येते. शिवनेसा आमची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेत भांडण लावून मजा पाहतेय.”, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
तसेच पुढे संजय शिरसाट यांनी म्हटले की, “ज्या मतादारांनी आम्हाला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ठोस निधी दिला गेला नाही, म्हणून नाराजी आहे. आमचा गट ठाम आहे. नियमानुसार आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी आमची साथ दिली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ मात्र ते आमच्यावरच कारवाई करत आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
- Haribhau Rathod : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया
- Jitendra Awhad : ‘राजकारणात वाद असावेत द्वेष नाही’; शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे घरी परतल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
- Sandipan Bhumre : संतप्त शिवसैनिकांनी संदीपान भुमरेंच्या फोटोला फासले काळे
- Rupali Thombre Patil : महाराष्ट्राला असुरक्षित करणाऱ्या आमदारांना कशाला हवी सुरक्षा – रुपाली ठोंबरे पाटील
- president election : औरंगाबादमधील तरुणाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<