आपल्या प्रत्येकाचे समाजाप्रती देन – संजय (मामा) शिंदे

पुणे: समाजात वावरत असताना आपल्या सर्वांचे समाजाप्रती देन लागत असून आपण सामाजिक कार्य करायला हव. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या माघे उभ राहण्याची गरज असल्याच मत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले आहे. सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन पुणे वतीने आयोजित सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, प्रसिद्ध उद्योजक रामभाऊ जगदाळे, ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी, कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी अप्पर पोलीस अधिक्षक शहाजीराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (तुरुंग विभाग) विठ्ठल जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेत्री करिश्मा वाबळे, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर, शोभा पाटील उपस्थित होते.

शहाजीराव पाटील म्हणाले, दोन्ही संस्थांची ध्येय आणि उदिस्ष्टे ही समाजाप्रती कार्य करण्याची असून पोलीस म्हणून कार्यरत असताना देखील आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. शिक्षण, आरोग्य, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये गरजूंना मदत देण्याकरीता संस्थेतर्फे भविष्यात देखील आम्ही प्रयत्नशील आहोत.

पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु एन.एस.उमराणी यांना सोलापूर कर्मयोगीपुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ॠतुजा भोसले, जगन्नाथ चटे, झुबरेपा काझी, प्रतिक चिंदरकर, अभिनेत्री रोहिणी माने, हरिष गुळीग, मंजूषा काटकर यांना देखील सोलापूर भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे रत्न पुरस्काराने अभय येतावडेकर, राज काझी, एम.ए.हुसेन, जगन्नाथ लडकत, अनिल गुंजाळ, अर्जुन सालेकर, डॉ.राजन पाटील, दत्तात्रय शिंदे, संगीता पुणेकर, धनंजय कोकणे, गणेश जगताप, दिपाली सय्यद, गोवर्धन दोलताडे, संध्या सोनावणे आणि योगेश कदम यांना गौरविण्यात आले.