फडणवीस सरकारच्या निर्णयाने संजय मामांच फावलं, अविश्वास ठरावाची टांगती तलवार कायम

blank

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा सोलापूर जि.पचे संजय शिंदे यांना होणार असल्याचं बोलले जात आहे, मात्र शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी भाजप व मित्र पक्षांनी सुरु केली आहे.

फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील जि.प. अध्यक्ष, सभापतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे, सोलापूर जि.पचे अध्यक्ष संजय शिंदे यांना याचा आपसूक फायदा होणार आहे, मात्र लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडल्याची खदखद भाजप नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली जात आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. राजेंद्र राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी संजय शिंदेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची सूचना करण्यात आल्याची महित्री सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयानुसार शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करणार कि त्यांना पद सोडावे लागणार हे लवकरच स्पष्ट होईल.

पूरग्रस्त भागात सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क रहा : फडणवीस

अजित पवारांच्या पाठोपाठ धनंजय मुंडेचीही जीभ घसरली, गिरीश महाजनांना म्हणाले ‘पिस्तुल्या’