fbpx

आपण कोणाच्या धमकीला घाबरत नाही, संजय शिंदेंचे चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर

टीम महाराष्ट्र देशा : माढा लोकसभा मतदार संघातून आघाडीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र इथून मागे संजय शिंदे हे भाजपच्या पाठींब्यावर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष होते. याच पार्श्वभूमीचा वापर करत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय शिंदेंनी भाजपशी गद्दारी केली असून त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य केल होत. तर आज संजय शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना घाबरत नाही. असे ते म्हणाले.

यावेळी संजय शिंदे म्हणाले की, मी कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता. त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नाही. तसेच संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. मात्र राष्ट्रवादीने उमेदवारीचे लालूच दाखवल्याने संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी कडे लगेचच धाव घेतली. ही बाब चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपा नेत्यांना खटकली असल्याने त्यांनी संजय शिंदे यांना केलेल्या गद्दारीची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. मात्र आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही अस म्हणत संजय शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.