fbpx

माढा नव्हे करमाळ्यातूनचंं आमदारकी लढवणार : संजय शिंदे

कुर्डूवाडी/हर्षल बागल : 2019 करमाळा विधानसभेत राष्ट्रवादीचं तिकीट रश्मी बागल यांनाच असून त्यांना कोण विरोध करतंय हे मी पाहतो असं स्पष्ट विधान राज्याचे माजी ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुर्डूवाडी येथील भर पावसात झालेल्या हल्लाबोल सभेत केले होते. काल परवा खुद्द शरद पवार यांनीच करमाळ्यात रश्मी, माढ्यात संजय शिंदे असे सुचक वक्तव्य केले होते. पण खा. शरद पवार तसेच माजी ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनसुब्यांना थेट सुरुंग लावण्याचं काम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले आहे.

सकाळी आपपल्या अधिकृत फेसबुकवरुन संजय शिंदे एक फेसबुक पोस्ट केली आहे.या पोस्टमध्ये आपण माढ्यातुन निवडणुक लढणार नाही तर आपण करमाळ्यातुनच लढवणार आहे असं स्पष्ट केलं आहे. एकेकाळी हेच संजय शिंदै अजित पवारांचे शिष्य होते. आत्ता शिष्यानेच गुरुला चँलेंन्ज केले आहे असे दिसत आहे.

नेमकं काय म्हटलं आहे संजय शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये
नमस्कार,मी यापूर्वीही जाहीर केले आहे की मी 2019 ला करमाळा विधानसभा लढणार आहे. आणि ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही .मी माढ्यातून आमदारकी लढवनार नाही, परंतु काहि विरोधक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सदर अफवा पसरवत आहेत किंवा बातम्या येत आहेत . तरी त्यावर कसलाच विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी करमाळा -माढा विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जोमाने तयारीला लागावे.-आपला विश्वासू,संजयमामा शिंदे.

रश्मी बागल यांना निवडून आणायची जबाबदारी माझी आहे असे विधान अजित पवारांनी केले होते. तर मागे ज्या चुका करमाळ्यात बबनराव तुम्ही केल्या आत्ता करणार का असा थेट सवाल पंढरपुरच्या सभेत खा. शरद पवारांनी आ. बबनराव शिंदे यांना केला होता. एका बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार , अजित पवार , सुनिल तटकरे हे करमाळ्यात राष्ट्रवादीच्या ऊमेदवार रश्मी बागल यांना निवडून आण्यसाठी प्रयत्न करीत असताना अजित पवांराचे शिष्य संजय शिंदे यांनी पुन्हा दंड थोपटणे म्हणजे चक्क पवार घराण्याला अन राष्ट्रवादीलाच चँलेंन्ज केल्यासारखे आहे. आपण कसल्याही परिस्थितीत करमाळ्यातूनच विधानसभा लढवणार असे संजय शिंदे पुन्हा म्हणत आहेत . संजय शिंदे यांच्या या गर्जनेमुळे पुन्हा करमाळ्यात राष्ट्रवादीचं तेल ही जाणार अन तुप ही जाणार अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

3 Comments

Click here to post a comment