VIDEO : सोलापूर जिल्हा बँक माहिते पाटलांमुळेच डबघाईला; संजय शिंदेंचा गंभीर आरोप

पुणे: राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ शासनाकडून बरखास्त करण्यात आले आहे. तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप तसेच थकबाकीची वसुली न करणे आदींसह इतर अनेक कारणांमुळं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

गेली अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांच्या कारखान्यांना देण्यात आलेले कर्ज वसूल करण्यात बँकेला अपयश आल्याच उघड झाले होते , तसेच बँकेच्या संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केल्याने नाबार्डने देखील नाराजी व्यक्त करत कारभार सुधारण्यास सांगितले होते.

दरम्यान, जिल्हा बँक डबघाईला येण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील जबाबदार असल्याचा आरोप सोलापूर जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष आणि सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष असणारे संजय (मामा) शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना आजवर बँकेमध्ये घडलेल्या कारभारार देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

bagdure

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला झटका; जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

 

‘या’ बड्या नेत्यांनी थकवले सोलापूर जिल्हा बँकेचे शेकडो कोटी..वाचा सोलापूर जिल्हा बँकेला अडचणीत आणणाऱ्या प्रमुख नेत्यांची यादी

You might also like
Comments
Loading...