मोदींना मनीऑर्डर करणाऱ्या संजय साठे यांची PMO कडून दखल

कांद्याबाबत मागवली होती माहिती

टीम महाराष्ट्र देशा – नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील संजय साठे या शेतक-याला कांदा विक्रीतून मिळालेली तुटपुंजी रक्कम त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मनीऑर्डर करून पंतप्रधान दुष्काळ निवारण निधीला मदत म्हणून पाठवली होती. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन तसंच संबंधित शेतकर्याोच्या परिस्थितीविषयी सविस्तर अहवाल पाठवण्याचा आदेश राज्य शासनानं केंद्राच्या वतीनं दिला असल्याची माहिती नाशिकचे प्रभारी निवासी जिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी काल पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

देशात शेतकरी आणि शेतीची आवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे देशभरातील विविध ठिकाणचा नाराज शेतकरी दररोज मोर्चे, आंदोलने करत सरकारबद्दलची नाराजी, आक्रोश व्यक्त करतो आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी मात्र आपली नाराजी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे. त्यामुळे या नाराजीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयानेही घेतली आहे. साठे यांनी 750 KG कांदा उत्पादित केला. मात्र, बाजारात त्याला केवळ 1064 रुपये इतके मूल्य मिळाले. त्यामुळे नाराज साठे यांनी हे पैसे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मनी ऑर्डर करुन पाठवले होते.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही मोदी गप्प का ? : राहुल गांधी

You might also like
Comments
Loading...