गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई: देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये तसेच राजकीय नेत्यांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप त्याच सोबत टीका देखील होताना दिसत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेच्या पाच राज्यातील निवडणुका लढण्याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारलं असता, पाच राज्यात शिवसेनेचा सरपंचही नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतान प्रत्युत्तर दिले आहे. त्याच सोबत निवडणूक आयोगाने कोरोना काळातील निवडणुकांसाठी घालून दिलेल्या नियमावलीवर बोलताना राऊत म्हणाले, नियमवली सर्वांना सारखी असावी ती एका राजकीय पक्षाच्या सोयीची नसावी, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या व्यक्तव्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणतात, कधी काळी गोव्यात भाजपचाही सरपंचही नव्हता, सरपंच काय पंचही नव्हता, गोमंतक पक्ष फोडून ते निवडून येऊ लागले, असे म्हणत राऊतांनी प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. दादरा-नगरहवेलीतही आमचा सरपंच नव्हाता तरी आम्ही जिंकलो, सरपंच असल्याचा नसल्याचा विधानसभेत काही फरक पडत नाही, आम्ही आधी विधानसभा जिंकू, मग सरपंच आपोआप होतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: