‘आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, काय अटक करायची ती करा, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या’

sanjay raut

मुंबई- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. ‘मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

‘आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, काय अटक करायची ती करा, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या,’ असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिलं आहे. ‘तुम्ही कितीही काहीही केलं तरीही या महाराष्ट्रात विजय सत्याचा होईल,’ असेही राऊतांनी यावेळी सांगितले.

ईडीने राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये. आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार आणि आमदार कोणाला शरण जाणार नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.सरनाईक हे हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून गेले ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.

महत्वाच्या बातम्या