मुंबई : खुर्चीचे संकट असताना महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते म्हणाले कि, आज मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. आशीर्वाद दिले. मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल, त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. असं देखील ते यावेळी म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ट्विट केलं आहे.
ट्विटमध्ये ते म्हणले कि, मुख्यमंत्री अत्यंत gracefully होते. पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले. जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ! असं राऊत ट्विटमध्ये म्हणाले.
मुख्यमंत्री अत्यंत gracefully
पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.
पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ! pic.twitter.com/smK6e3GKHa— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
दरम्यान, आज उद्या बहुमत चाचणी होणार कि नाही यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. हा युक्तिवाद जवळपास साडे तीन तास सुरु होता. यानंतर याचा निकाल हाती आला आहे. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या ११ ते ५ यावेळेत बहुमत चाचणी होणार आहे. राज्यपालाच्या सूचनेनुसार उद्या हि चाचणी होणार आहे. तसेच उद्या एकनाथ शिंदे देखील या बहुमत चाचणीला उपस्थित राहणार आहे. यानंतर या चाचणीला नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देखील चाचणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<