मुंबई : मुंबईत १४ मे रोजी झालेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा विरोधकांना भारी पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. प्रत्येक फटकाऱ्याने विरोधकांचे दात घशात घातले. यानंतर रविवारी मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटर येथे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन शिवसेनेवर सडकून टीका केली. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले. सकाळी सकाळी संजय राऊतांच्या या ट्विटची सगळीकडे चर्चा होत असताना पाहायला मिळत आहे.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
अपघात अटळ आहे.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा खाली आला असता. माझ्यावर एवढा विश्वास आहे? मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा १२८ होतो. उद्धवजींना ही भाषा नाही समजणार. उद्धवजी तुम्हाला वाटतंय, माझ्या पाठीवर खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करु शकाल. लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली पाडल्याशिवाय थांबणार नाही”, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.
“उद्धव यांनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते आणि मी धू्र्त आहे, हे खरंच आहे. ज्याला प्राण्यांची माहिती आहे त्याला विचारा. वाघ हा भोळाच असतो. पण धूर्त कोण असतो? त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण सोडायची नाही. त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही म्हणून पातळी सोडून बोलतात. अमित साटम यांनी भ्रष्टाचाराचं पुस्तक छापलं. बाळासाहेब वाघ होतेच. पण आता या देशात एकच वाघ आहे. त्या वाघाचं नाव नरेंद्र मोदी नाव आहे”, असेही देवेंद्र फडणवीस सभेत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –