मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. आज १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. अशातच त्यांचा न्यायालयीन मुकाम वाढला असून पुढील सुनावणीची तारीख देखील समोर आली आहे.
1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. असातच आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या जामीन अर्ज तसेच नियमीत सुनावणी पार पडली.
दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी १७ ऑक्टोबरला होणार आहे. ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. कोर्टाच्या परिसरात संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यादरम्यान, संजय राऊतांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. या आधीही अनेक पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली आहेत, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ravi Rana | श्री रामप्रभूंनी ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावलं ; आमदार रवी राणा यांची टीका
- Devendra Fadnavis | संविधानावर हल्ला करण्याची शिवसेना,काँग्रेसची पद्धत – देवेंद्र फडणवीस
- Ambadas Danve | अब्दुल सत्तार अन् अमृता फडणवीसांवर अंबादास दानवे यांचा घणाघात, म्हणाले…
- Travel Tips | कमी बजेटमध्ये होऊ शकते युरोप ट्रीप, कशी? ते जाणून घ्या!
- Raj Thackeray | राज ठाकरे अयोध्येला जाणार? अयोध्येतील महंतांनी भेट घेत दिले निमंत्रण