fbpx

राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही – संजय राऊत

raut-sanjay

टीम महाराष्ट्र देशा : ”कर्नाटकात राज्यपालाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यपाल आरएसएसचे आहेत. त्यामुळे राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवाय, ”२०१९च्या निवडणुकांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही”, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊता यांनी केला आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेचा निर्णय राज्यपाल वजुबाई वाला यांच्या हातात आहे. राज्यपाल वजुबाई वाला सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती सोपवणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्यपाल पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला.