आठवलें पाठोपाठ संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : राज्यामध्ये निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाच्या परिस्थितीमध्ये भाजपचा मित्रपक्ष आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आठवले यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटी संदर्भात बोलताना आठवले यांनी आपण राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी सल्ला घेण्यासाठी आल्याचं सांगितलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे आता पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले आहेत. दिवसभरात सुरु असणाऱ्या वेगवेगन राजकीय घडामोडीमध्ये राऊत पवारांची भेट घेणार असल्याने सर्वांचे लक्ष बैठकीकडे लागले आहे. दुसरीकडे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार आहेत.

पवार यांच्या भेटी संदर्भात बोलताना आठवले यांनी राज्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये काय करायला हवं, याचा सल्ला घेतल्याचं सांगितलं आहे. शरद पवार आणि माझे गेली अनेक वर्षे जवळचे संबंध आहेत. राज्यामध्ये गेली पंधरा दिवस निर्माण झालेल्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये काय करायला हवं, याचा सल्ला घेण्यासाठी मी त्यांच्या भेटीला आलो आहे. आधी त्यांचा सल्ला घेऊन पुन्हा भाजप – शिवसेनेला सल्ला देणार असल्याचं आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या