औरंगाबाद : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. या मुद्द्यावरून आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत, असा आरोप केला. दरम्यान, याच मुद्द्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना छगन भुजबळ म्हणाले की, ‘किरीट सोमय्या कुठे असतील हे मला माहित नाही. ते नक्कीच संजय राऊत यांना माहित असेल. त्यांना माहित आहे सोमय्या कुठे आहेत. आणि नाहीच तर तेच सोमय्यांना शोधून काढतील’,असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केली नाही ना? सोमय्यांना ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे, असे मुंबई गुन्हे शाखेने आज कोर्टात सुनावणीदरम्यान म्हंटले आहे. तसेच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टात उत्तरही सादर करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- “भाजपकडून मनसेचा फक्त वापर सुरु”, जयंत पाटलांचा दावा
- “इश्क़ में हम तुम्हे क्या बताये…”, मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
- IPL 2022 : युझवेंद्र चहलचा कहर..! लखनऊविरुद्धच्या सामन्यात रचला ‘नवा’ रेकॉर्ड; वाचा!
- राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
- राज्य सरकारचे मोठे धोरण; सोयाबीन, कापसाचे उत्पादन वाढणार!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<