संजय राऊतांना ‘या’ दिवशी मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. भाजप आणि शिवसेनेनंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार की राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल करणार हे पाहावं लागेल.

शिवसेनेला सत्ता स्थापनेच आमंत्रण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सोमवारी सुरू होते. या सर्व घडामोडींमध्ये संजय राऊत आघाडीवर होते. मात्र, दुपारी अचानक छातीत वेदना होत असल्याने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते.

सोमवारी रात्री राऊत यांच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले आहेत. दरम्यान, राऊत यांना अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात हलवण्यात आले असून, त्यांना उद्या सुटी मिळण्याची शक्यता आहे. सध्या राऊत यांचा लिखाण करतानाचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या सगळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा म्हणून भाजपला शिंगावर घेतल्यामुळे राऊत यांना राज्याच्या राज्कारांत वेगळ महत्व प्राप्त झाल आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांनी नेहमीच परखड भाषेत भाजपला सुनावलं आहे. आता लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना देखील संजय राऊत सामना साठी अग्रलेख लिहित असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे लढण्याची जिद्द काय असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे संजय राऊत असे स्तुती सुमने राऊत यांच्यावर उधळली जाऊ लागले आहे.

दरम्यान, कोशिश करने वालों की कभी हार नही होती..,’ असे म्हणत लिलावती रुग्णालयातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट देखील केले होते. राऊत हॉस्पिटलमध्ये असल्याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडू शकत नाहीत. मात्र नेहमी प्रमाणे ट्विट करून राऊत यांनी भाजपला इशारा केला आहेत. या ट्विट मध्ये त्यांनी म्हणाले आहे की, ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती,’ असे म्हणत पुन्हा एकदा राऊतांनी आपली ताठर भूमिका स्पष्ट केली आहे.