संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर

मुंबई : सामनाच्या कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर सविस्तर भूमिका मांडली आहे. यात त्यांनी आगामी काळात जॉर्ज फर्नाडिस यांच्या बायोपिकमध्ये सुशांतसिंह राजपूत हा संभाव्य ‘जॉर्ज’ म्हणून डोक्यात असल्याचाही मोठा खुलासा केला. त्यांनी रोखठोक सदरातील ‘सुशांतच्या आत्महत्येस कारण की…’ या लेखात सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरही ताशेरे ओढले.

सरकारचा मोठा निर्णय, सहकारी बँकांतील सामान्यांच्या ठेवींना सरकारी संरक्षण

ठाकरे सिनेमाची निर्मिती संपली आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचं ठरलं. त्यावेळी जॉर्ज यांची भूमिका करणाऱ्या चेहऱ्यांची शोधाशोध सुरू झाली. त्यात सुशांतच्या नावावरदेखील विचार करण्यात आला असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

सुशांत हा त्यांच्या नजरेत होता. तो एक उत्तम अभिनेता असून त्याच्या कामावर सगळ्यांचं प्रेम होतं. त्यामुळे जॉर्ड फर्नांडिस यांच्या बायोपिकसाठी सुशांतच्या नावाचा विचार करण्यात आला. पण यावेळी दोन दिवसांनी संजय राऊत यांना धक्कादायक माहिती मिळाली होती. सुशांत एक गुणी अभिनेता असला तरी तो सध्या मानसिक तणावाखाली असल्याचं संजय राऊत यांना सांगण्यात आलं.

शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुशांत सध्या डिप्रेशनमध्ये आहे. सिनेमाच्या अनेक सेटवर त्याने अनेक वेळा विचित्र वागणूक केल्याचंही समोर आलं. याचा सगळ्यांना त्रास होतो. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनी याच कारणामुळे त्याच्याशी करार मोडला असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सुशांतसारखे सच्चे अभिनेते त्यांच्या कलागुणांमुळे मोठे होतात. प्रगतीची उंच शिखरं गाठतात. पण हिंदी सिनेसृष्टीत काही 4-5 लोकांनी तळ ठोकला आहे, हे सुद्धा खरं आहे. पण त्यामुळे सुशांतने आत्महत्या केली हे म्हणणं योग्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले. कारण, जर आपण असा विचार केला तर दिवसाला एक अभिनेता आपलं आयुष्य गमावेल.