Share

Sanjay Raut | “महाराष्ट्र पेटला तर…” ; कर्नाटक वादावरुन संजय राऊत यांची शिंदे सरकारवर जहरी टीका

Sanjay Raut | मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाने उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले आहेत. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुर्चीवर बसून महाराष्ट्राचा अपमान पाहत आहेत. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल. मंत्री डरपोक आहेत.ते कर्नाटकात कधी जातात, याची आम्ही वाट पाहत आहोत.”

“हे डरपोक लोक आहेत. मंत्र्यांचे काय घेऊन बसला आहात. कर्नाटकातून यांना खलिता आला येऊ नका. यांची हातभर फाटली. यांनी जायला पाहीजे होतं. मंत्र्यांनी धाडसाने जायला पाहीजे होतं. कसला कायदा-बियदा सांगत आहात. आमच्या गाड्या फोडल्या ते कायद्यात बसते का?, बेळगाव-कारवार हा महाराष्ट्राचा भाग आहे. आमच्या बापाचा आहे,” असे राऊत म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला षंढ समजू नका. आम्ही काय बांगड्या भरल्या का?. तुम्ही आमच्या बस फोडल्या तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही, असे तुम्ही समजत आहात का? मराठी माणूस शांत बसला आहे. तर आम्ही बांगड्या भरल्या, असे समजू नका. या भूमिवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, ऐवढे ध्यानात ठेवा. मराठी माणूस कर्नाटकात कमी आहे. मात्र मुंबईमध्ये कन्नड जास्त आहेत. बंगळुरु पेक्षा जास्त कर्नाटकी मुंबईमध्ये राहतात.

महत्वाच्या बातम्या : 

Sanjay Raut | मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाने उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics