अरुण जेटलींचं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी जवळच नातं- संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा:- देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, अरुण जेटलींचं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी जवळच नातं होतं. अरुण जेटली यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि भारतातल्या अर्थ नीतीला सुरक्षित आणण्याचं काम केलं होतं, असे राऊत म्हणाले. तसेच ‘अरुण जेटली यांचे निधन देशाला धक्का आहेच, पण शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंघ ठेवणारा महत्त्वाचा खांब कोसळला आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान जेटली यांना ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

महत्वाच्या बातम्या